नशीब उजळायला वेळ लागत नाही ती फक्त वेळ आली पाहिजे हे म्हणतात ते अगदी खरे आहे.अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे.ड्रीम-११ या ऑनलाईन गेम मध्ये क्रिकेट टीम तयार करून खेळ जिंकल्याने तब्बल दीड कोटी रुपये मिळविले आहेत. पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारा रातोरात करोडपती झाला आहे.पोलीस उपनिरीक्षक गेल्या तीन महिन्या पासून फॅन्टसी क्रिकेट अँपवर एका टीममध्ये हा खेळात होता.दरम्यान, नशिबाने साथ दिली आणि त्याने निवडलेला संघ पहिल्या क्रमांकावर राहिला.
सोमनाथ झेंडे असे दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.सोमनाथ हा पिंपरी-चिंचवड पोलीस आययुक्तालयात कार्यरत आहे.सोमनाथने दीड कोटी रुपये जिंकल्याने त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असल्याचे सोमनाथने सांगितले.सोमनाथने बांगलादेश विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन संघ बनवला.हा संघ पहिल्या क्रमांकावर राहिला आणि सोमनाथ झेंडेने दीड कोटी रुपये जिंकले.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात पुन्हा ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
फक्त पॅलेस्टिनी का? गिलगिट-बाल्टीस्तानच्या मुस्लिमांनी काय घोडं मारलंय?
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!
तब्बल दीड कोटी रुपयाचे बक्षीस जिंकल्यानंतर सोमनाथ म्हणाला, माझी टीम प्रथम क्रमांकावर आली आणि मला दीड कोटी रुपयाचे पहिले बक्षीस लागले.एवढी मोठी रक्कम जिंकल्याने प्रथमतः मला विश्वास बसला नाही.मात्र थोड्या वेळात माझ्या खात्यावर जिंकलेली रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आणि मी आणि माझे कुटुंब खूप खुश झाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र,अशा ऑनलाईन गेम पासून सावधान राहिले पाहिजे.या खेळाची सवय लागू शकते, त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.गेमबाबत आपण सावधगिरी बाळगून आपल्या जबाबदारीवर खेळले पाहिजे, असे सोमनाथने सांगितले.