पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश गेटवे ते एलिफन्टा लाटांवर झाले स्वार

नेटकाऱ्यानी केले साहसाचे कौतुक

पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश गेटवे ते एलिफन्टा लाटांवर झाले स्वार

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,  कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
आत्ता असेच अगदी एक ट्विटर वर व्हिडिओ बघताना जाणवले. साहस आणि साहसी खेळांचे शौकीन लोक जगभरांत आपल्याला बघायला मिळतात. असे म्हणतात कि वेडी लोकच इतिहास रचतात आणि आज त्याचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळाला. साहसी लोक त्यांच्या त्या साहसी वृत्तीसाठी कशाचीच पर्वा साहस करण्यासाठी करत नाहीत. असाच एक पराक्रम भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी केला आहे. तो पराक्रम करणारे ते जगातले पहिले मानांकित व्यक्ती ठरले आहेत.

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफन्टा गुफांपर्यंत समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन एक नवीन इतिहास आज रचला आहे. त्यांचा या पोहण्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणांत व्हायरल झाला आहे. कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी हा पराक्रम करणारे ते पहिलेच ठरले आहेत. कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या या साहसाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांची हि साहसी मोहीम पाण्यात बुडण्यापासून बचाव करण्याच्या आणि त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. या व्हिडीओ मध्ये कृष्ण प्रकाश प्रसाद हे मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया येथून त्यांनी समुद्रात पोहायला सुरुवात करून १६.२० किलोमीटरचे अंतर पाच तास २६ मिनिटांमध्ये त्यांनी एलिफंटा लेण्याजवळ यशस्वीपणे पूर्ण केले.

हे ही वाचा:

विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीची राजकारणात उडी

आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू

रविवार २६ मार्च २०२३ ला कृष्ण प्रसाद यांनी लाटांवर स्वार होऊन हे अंतर कापले आहे. त्यांना यासाठी पाच तास सव्वीस मिनिटे लागली असून गेट वे ऑफ इंडिया येथून त्यांनी सकाळी पावणे आठ वाजता सुरुवात केली. या साहसी उपक्रमाची विशेषतः म्हणजे त्यांनी समुद्राच्या लाटांच्या विरोधात पोहायला सुरुवात केली. नमूद करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे जलतरणपटू हे एलिफंटा लेणी ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास करतात पण कृष्ण प्रसाद यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन एक मोठा इतिहास रचला आहे. आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.

कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी ट्विट केलेला व्हिडिओला आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. त्याला सहा हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. कृष्ण प्रकाश प्रसाद यांचे युजर्सनी भरपूर कौतुक केलेले दिसत असून त्यांना खूप साऱ्या अभिनंदनाचा वर्षाव पण होत आहे. याशिवाय हा इतिहास रचल्याबद्दल त्यांचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, कृष्ण प्रकाश प्रसाद हे पोलीस दलातील आयर्नमॅन म्हणून ओळखले जातात. ते एक धडाकेबाज पोलीस म्हणून त्यांची ओळख आहे. मागील वर्षी ते पिंपरी चिंचवड ला पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाले होते.

Exit mobile version