मुंबईतील सांताक्रुज येथे एका पोलीस शिपायाला मांजामुळे जीव गमवावा लागल्याची धक्कदायक घटना घडली आहे. कर्तव्य बजावून घरी परतत असताना त्यांचा मांजा ने गळा चिरला गेला. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. समीर जाधव (वय ३७ वर्षे) असे मृत शिपाई पोलिसाचे नाव आहे.
दिंडोशी पोलिस ठाण्याचे समीर सुरेश जाधव (वय ३७ वर्षे) (पोलीस शिपाई क्र. १११६१५) हे आपले कर्तव्य बजावून घरी परतत होते. ते मोटार सायकल वरून वरळीतील बीडीडी चाळ येथे जात सांताक्रूझ येथील वाकोला ब्रिजजवळ त्यांच्या गळ्याला मांजा लागला. मांजाने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल १ यांनी तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हे ही वाचा:
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार, एकाचा मृत्यू!
उदयनिधीनंतर दयानिधींना उबळ, ‘उ. प्र., बिहारमधले हिंदीभाषिक तमिळनाडूत शौचालये स्वच्छ करतात’
हिजाब बंदीवरून सिद्धरामय्या यांचा युटर्न
ही माहिती खेरवाडी पोलीस ठाण्चेयाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली असून समीर यांच्या नातेवाईकांनाही याची माहिती देण्यात आली आहे. सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हजर असून दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक याठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे.