युद्धविराम संपुष्टात आल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा पट्टीवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. इस्रायलचे सैन्य आता जबालिया, शेजाइया आणि खान युनिस शहरांत दाखल झाले आहेत. तेथील हमासच्या ठिकाणांवरून डिजिटल यंत्रे आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यानुसार, ते इस्रायलवरील हल्ल्याचा कट दीर्घकाळापासून चालवत होते, असे स्पष्ट होत असल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे.
हमासच्या दहशतवाद्यांकडून मोबाइल फोन, कम्प्युटर, डीपीएस डिव्हाइस, कॅमेरा आणि नोटबूक यांसारख्या वस्तू सापडल्या आहेत. त्यानुसार, गाझा पट्टीनजीक इस्रायलच्या सीमेवरील किबुत्झवरील हल्ल्याचा कट गेल्या काही वर्षांपासून रचला जात होता, असे आढळून आले आहे. कम्प्युटरमधून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हमासच्या एका मृत दहशतवाद्याकडून काही सॅटेलाइट छायाचित्रेही मिळाले असून त्यात जिथे हल्ले होणार होते, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून सेंथिल यांची कानउघाडणी!
‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’
करणी सेना प्रमुखाच्या हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली
नवी मुंबईतून ४८ तासांत सहा मुले बेपत्ता
दहशतवाद्यांना लोकांना मारण्याचे आणि कैद करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच, एखादा कैदी जास्तच त्रास देत असेल तर त्याला तिथल्या तिथे ठार करावे, अशाही सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. संपूर्ण गाझा पट्टीमध्ये भुयारी मार्गांचे, बोगद्यांचे जाळे पसरले आहे. तेथे अगणित नागरिकांना कैद केले जाऊ शकते, अशी माहिती इस्रायलच्या सैन्यदलाने दिली.
गाझामधील कोणतेच शहर सुरक्षित नाही
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमधील आता कोणतेही शहर सुस्थितीत नाही. आता गाझाची अवस्था आणखी बिकट झाली आहे. मुलांचे मृत्यू होत आहेत. आतापर्यंत गाझामधील एक तृतीयांश नागरिक विस्थापित झाले आहेत.