भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांच्या नावे ओळखला जाणार ग्रह

आतापर्यंत पाच भारतीयांना सन्मान

भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांच्या नावे ओळखला जाणार ग्रह

आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (आयईयू) भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे नाव एका छोट्या ग्रहाला ठेवून त्यांना सन्मानित केले आहे. याआधी केवळ अन्य पाच भारतीयांनाच हा सन्मान मिळाला आहे.

२१ जून २०२३ रोजी ऍरिझोना येथे झालेल्या ‘लघुग्रह, धूमकेतू, उल्का संमेलना’त हा सन्मान भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांना देण्यात आला. अश्विन शेखर हे आधुनिक भारताचे पहिले उल्का खगोलशास्त्रज्ञ आहेत, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांनी उल्कापात संदर्भातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

छोट्या ग्रहांचे नामकरण दोन प्रकारे होते. पहिले औपचारिक आणि दुसरे अनौपचारिक. औपचारिक नामकरण हे सुप्रसिद्ध व्यक्तींना मानद डॉक्टरकी प्रदान केल्याप्रमाणे असते. ज्यात खगोलशास्त्रज्ञ ज्या ग्रहाचा, ताऱ्याचा किंवा धूमकेतूचा शोध घेतो, त्याच्या पसंतीचे नाव आयईयूला प्रस्तावित करतो. त्यानंतर हा खगोलशास्त्रज्ञ या सन्मानासाठी पात्र आहे का, याबाबत आयईयू पडताळणी करते. तर, अनौपचारिक नामकरणात आयईयूला ज्येष्ठ वैज्ञानिकांपैकी एका नावाचा पर्याय दिला जातो. त्यानंतर तो शास्त्रज्ञ या नावासाठी खरोखरच पात्र आहे, हे सिद्ध झाल्यास आयईयूची नामकरण समिती या नावाला अनुमोदन देते.

अनौपचारिक नामकरणाचा उद्देश लोकांना त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन देणे, हा आहे. अश्विन यांना याच प्रकारे सन्मानित करण्यात आले आहे. अश्विन यांचे नाव दिलेला लघुग्रह अश्विन शेखर = २००० एलजे २७ या नावाने ओळखला जाईल. अश्विन सध्या फ्रान्स सरकारच्या विज्ञान, प्रौद्योगिक आणि शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पॅरिसच्या एका वेधशाळेसाठी कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार

महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप

सूत्रांच्या पूड्यांचा अर्थ एवढाच महाविकास आघाडीचे तारु बुडते आहे

हाताने मैलासफाईची पद्धत बंद करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश

याआधी पाच भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे. यामध्ये नोबेल पुरस्कारविजेते सी. व्ही. रमण, सुब्रमण्यम चंद्रशेखर, महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन, खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई आणि महान खगोलशास्त्रज्ञ आणि आयईयू मनालीचे माजी अध्यक्ष कल्लाट वेणू बप्पू यांचा समावेश आहे.

Exit mobile version