बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या आठवडाभरानंतर त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकीचा फोटो हल्ल्यातील एका आरोपीच्या फोनवरून जप्त करण्यात आला होता. पोलीस तपासादरम्यान वडील बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीच्या फोनवरून आमदार झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला आहे.
हा फोटो आरोपींना त्यांच्या हँडलरने स्नॅपचॅट या ॲपद्वारे पाठवला होता. याचा वापर कट रचणारे आणि शूटर यांच्या संवादासाठी वापरत होते, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या शुभम लोणकरच्या हँडलरच्या आदेशानुसार हे संदेशही हटवण्यात आले.
हेही वाचा..
…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन
ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य
विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी
बाबा सिद्दीकीच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर शुभमचा भाऊ प्रवीण लोणकर याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा दावा केला होता. तत्पूर्वी तपासात आरोपींनी झीशान सिद्दीकीलाही लक्ष्य केले होते. शुभम लोणकरने बाबा सिद्दीकीच्या महाराष्ट्रातील उंचीबद्दल माहिती नसल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ही हत्या केली असती म्हणून शुभम लोणकरने धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांची निवड केल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
शनिवारी मुंबई गुन्हे शाखेने सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांना या हत्येचे कंत्राट देण्यात आले होते आणि त्यांनी सुरुवातीला एक कोटी रुपयांची मागणी केली होती. कनोजिया हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. त्याला बाबा सिद्दीकीच्या हत्येचे परिणाम माहीत होते, त्यामुळेच तो संकोच करत होता आणि आणखी पैशांची मागणी करत होता. पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.
बाबा सिद्दीक यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील निर्मल नगर येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूच्या १५ दिवस आधी त्याने धमक्या मिळाल्याची तक्रार केली होती. गोळी घातली तेव्हा त्यांच्यासोबत एक हवालदार होता. डोळ्यात मिरचीसारखा पदार्थ गेल्याने हा हवालदार त्यांचे संरक्षण करू शकला नाही.