मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला

जोरदार पाउस मुंबईत सुरु असताना ग्रँट रोड परिसरात एका म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्धेचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरु केले. याशिवाय या इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

ग्रॅण्ड रोड स्थानकाबाहेर रुबिनिसा मंझील ही इमारत आहे. या इमारतीचा तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी ११ वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत २० ते २२ नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

हेही वाचा..

हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक !

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला !

राहुल गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनावे

बांगलादेशात आरक्षण वाद पेटला, कर्फ्यू लागू, निदर्शनांमध्ये १०५ जण ठार !

आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही भागात जनजीवन देखील वि्कळीत झाल्याचे दिसून आले. या पावसामुळे वाहतूक तसेच जनजीवनावर परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी वेळ झाला. काही ठिकाणी लोकल धीम्या गतीने सुरु होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.

Exit mobile version