इलॉन मस्कच्या ब्रेन-चिप स्टार्टअप न्यूरालिंकने गुरुवारी दाखवून दिले कि त्याचा पहिला रुग्ण हा न्यूरालिंक उपकरण वापरून केवळ त्याच्या विचारांनी ऑनलाइन बुद्धिबळ आणि व्हिडिओ गेम खेळू शकतो. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुग्णाला चिप लावल्याचेही दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये, रुग्णाने स्वतःची ओळख २९ वर्षीय नोलँड अर्बाग म्हणून दिली आहे. त्याचा अपघात झाला होता त्यानंतर त्याला खांद्याच्या खाली अर्धांगवायू झाला होता.
तो लॅपटॉपवर बुद्धिबळ खेळताना आणि न्यूरालिंक उपकरण वापरून कर्सर हलवताना व्हिडीओमध्ये दिसत होता. न्यूरालिंक म्हणजे काय? तर मस्कने २०१६ मध्ये स्थापन केलेले न्यूरालिंक हे ब्रेन-चिप स्टार्टअप आहे. हे एक साधन आहे. ते नाण्याच्या आकाराचे असून त्याचे मानवाच्या कवटीत शस्त्रक्रियेने रोपण केले जाते. त्याच्या अति-पातळ तारा मेंदूमध्ये जातात आणि मेंदू-संगणक इंटरफेस विकसित करतात. डिस्क मेंदूच्या क्रियाकलापांची नोंदणी करेल आणि सामान्य ब्लूटूथ कनेक्शनद्वारे स्मार्टफोनसारख्या डिव्हाइसवर पाठवेल.
हेही वाचा..
अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणाऱ्या चीनला अमेरिकेने फटकारलं
चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला
सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसनंतर पतंजलीकडून भविष्यात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती न करण्याचे आश्वासन
यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्टार्टअपचे संस्थापक मस्क म्हणाले की, न्यूरालिंकच्या ब्रेन चिपने प्रत्यारोपित केलेला पहिला मानवी रुग्ण पूर्णपणे बरा झालेला दिसतो. त्याच्या विचारांचा वापर करून संगणक माउस नियंत्रित करण्यात सक्षम होता. ही प्रगती चांगली असून हा रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे असे दिसते. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम नाहीत असेही मस्क म्हणाले. मस्क यांनी समाज माध्यमावर एक्स वर असे सांगितले आहे की, रुग्ण फक्त विचार करून स्क्रीन भोवती माउस हलवू शकतो. न्यूरालिंक आता रुग्णाकडून जास्तीत जास्त माऊस बटण क्लिक मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मस्क यांनी सांगितले.