पिट बुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका दीड वर्षांच्या मुलीचा पाय तीन ठिकाणी मोडला असून तिच्यावर १७ दिवस रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील बुरारी परिसरातील उत्तराखंड कॉलनीत ही घटना घडली. ही घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. या घटनेतील मुलीचा पाय तीन ठिकाणी मोडला असून तिला तब्बल १८ टाके लागले आहेत. तिला १७ दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल सात ते आठजण या मुलीची कुत्र्याच्या जबड्यातून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होते.
या मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी बुरारी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांना सीसीटीव्हीचे फुटेजही सादर केले. मात्र, तरीही त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. उलट त्यांनी तडजोड करावी, असा दबाव पोलिसांनी आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, या कुत्र्याच्या मालकावर कोणतीही कारवाई न झाल्याचे मुलीच्या आजोबांनी सांगितले.
कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत माजली असून अनेक जण त्यांच्या घरातून बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. एकाच कुटुंबातील तिघा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटनाही घडली असल्याचे या मुलीच्या आजोबांनी सांगितले. या पिट बुल जातीच्या कुत्र्याची परिसरातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हे ही वाचा:
राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर
चेहऱ्यावर मनमोहक हास्य, कपाळावर टिळा अन हातात धनुष्यबाण!
देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!
पिट बुल जातीचे कुत्रे हे धोकादायक मानले जात असल्याने त्यांच्यावर भारतात बंदी आहे. तर, ‘धोकादायक’ कुत्र्यांच्या जाती पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी परवान्यावर बंदी घालण्याचा निर्णय तीन महिन्यांच्या आत घेतला जाईल, असे . गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते.