वसईमध्ये घडलेल्या एका दुर्देवी घटनेत एका साडे वर्षाच्या चिमुरडी इमारतीवरून खाली कोसळली.
सातव्या मजल्यावरून पडून या मुलीचा मृत्यू झाला. गॅलरीतून खाली पडलेला माेबाईल वाकून बघताना तिचा अचानक ताेल गेला आणि ही घटना घडली आहे. वसईतल्या अग्रवाल टाऊनशीप या उच्चभ्रू साेसायटीत असलेल्या रिजन्सी साेसायटीमध्ये ही दुर्घटना घडली. श्रेया महाजन असे मृत्यू झालेल्या चिमकुलीचे नाव आहे.
महाजन कुटुंब रिजन्सी साेसायटीमध्ये सातव्या मजल्यावर राहते. घटना घडली त्यावेळी श्रेयाची आई माेठ्या मुलीला साेडण्यासाठी शाळेत गेली हाेती. त्यावेळी श्रेया घरात झाेपलेली हाेती. झाेपेतून जाग आल्यावर ती माेबाईल घेऊन गॅलरीत जाऊन माेबाईलवर खेळायला लागली. खेळताना माेबाईल हातातून निसटला अणि खाली पडला. वाकून माेबाईल बघताना तिचा ताेल गेला आणि मृत्यू ओढवला. या प्रकरणी माणिकपूर पाेलिस ठाण्यात आ कस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
मयत मुलीचे वडील कामानिमित्त सिंगापूरला असतात. त्यामुळे घरी आई आणि दोन मुलीच राहतात. सकाळी श्रेयाची आई ७ वर्षाच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. यावेळी छोटी मुलगी श्रेया घरी एकटीच झोपली होती.
पडली आणि हुकला अडकली
माेबाईल हातातून सटकल्यावर श्रेया गॅलरीतून वाकली. त्याचवेळी ताेल जाऊन ती सातव्या मजल्यावरून खाली पडली. पण ती सोसायटीच्या डकमधील एका एसीच्या हुकला लटकली. यात तिच्या मणक्याचे हाड मोडले आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आईला बसला मोठा धक्का
मुलीची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडून घरी आली तेव्हा सोसायटीच्या वॉचमनने तिला एक मुलगी गॅलरीतून पडली असल्याचे सांगितले. महिलेला तिकडे धाव घेत पाहिले असता ती तिचीच मुलगी होती. मुलीला अशा अकस्मात निधनाने आईला अश्रू अनावर झाले होते.