स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवा कायदा करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवा कायदा करणार

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी या अधिवेशनातच नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनमध्ये बातमीदारांशी बोलताना दिली. या संदर्भात विविध संघटनाशी चर्चा केली असल्याचेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात गेल्या अडीच वर्षात विक्रमी पदभारती सरकारने केली आहे. ७५ हजार पद भरतीची घोषणा केली होती मात्र १ लाख ८ हजार नोकऱ्या सरकारने दिल्या आहेत. हा एक विक्रम सरकारने केला आहे. या सर परीक्षा अत्यंत पारदर्शी पणाने पार पडल्या आहेत. लवकरच वर्ग क ची पदभरती ही राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात येईल. तसा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा..

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच

नवे कायदे लागू – फडणवीस

देशात १०० वर्ष ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यांची अमलबजावणी होत होती. मात्र ब्रिटिशांनी हे कायदे भारतावर राज्य करण्यासाठी बनवले होते. आता संसदेने नवे कायदे पास केले आहेत. ते आता लागूही झाले आहेत. राज्यात त्या अनुषंगाने पोर्टल तयार करण्यात आली आहेत. हे कायदे केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करतो, असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version