महाराष्ट्र सरकार मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्म सिटी उभारणार आहे
– मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
हे ही वाचा:
सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…
रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल
भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं
सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो
कलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार मुंबई आणि ठाणे या शहरांच्या दरम्यान फिल्मसिटी उभारण्याच्या योजनेवर काम करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या १२ हजार पाचशेवा प्रदर्शनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात शिंदे म्हणाले, “राज्य सरकार मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मदत करेल. ठाण्यातही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्म सिटीची योजना आखण्यात येणार आहे”. शिंदे पुढे म्हणाले, “राज्याच्या राजधानीपासून ठाणे हे २३ किमी अंतरावर आहे. नाट्यगृहाच्या दुरवस्थेचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी नोडल ऑफिसर नेमला जाईल आणि त्या सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील”. दामले यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुंबई शहरात वसलेल्या फिल्मसिटीच्या विकासाच्या योजना बऱ्याच दिवसांपासून रेंगाळल्या आहेत. मुंबई फिल्मसिटी ६०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरले आहे.