हिंदमाता परिसर पावसाच्या पाण्यापासून मुक्त करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेमार्फत भूमिगत पाण्याच्या टाक्यांचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता या ठिकाणी परिसरातील रहिवाश्यांसाठी नव्या सरकत्या जिन्यांचा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येथील रहिवाश्यांसोबतच उपनगरीय रेल्वे प्रवासी केईएम, टाटा आणि वाडिया येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ये-जा करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
परेल परिसरात मोठ-मोठ्या कॉर्पोरेटर कंपन्या सोबतच, शाळा, महाविद्यालय, घाऊक कपड्यांचे दुकान व मोठ्या रुग्णालयांसह दाट लोकवस्तीमुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. वर्षानुवर्षे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते, त्यामुळे इथला संपूर्ण परिसर जलमय होतो. महापालिकेच्या अथक प्रयत्नानंतर पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या त्यामुळे या परिसरातील पाणी तुंबण्यावाचून सुटका झाली. तसेच हिंदमाता परिसरातील ओव्हरब्रीज आणि परळ ब्रिज जोडण्यात आला असल्यामुळे येथील पादचाऱ्यांना वळसा घालून जावं लागत. त्यामुळेच हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच
कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन
काँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक
‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’
नागरिकांना असा होणार फायदा…
पावसाळ्यात वाहतुकीच्या सुविधेसाठी परळ आणि हिंदमाता उड्डाणपुलाच्या दरम्यान रस्त्याची उंची १.२ मीटर ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जून २०२१ मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर पाऊस सुरु असतानाही या ठिकाणांची वाहतूक सुरु राहण्यास मदत झाली. तसेच येथील राहिवशी व उचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या गैरसोय दूर होण्यासाठी हा पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी १५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.