नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर

नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर

नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. कोविडच्या या कठीण परिस्थितीत या नव्या कोविड सेंटरमुळे नागपुरकरांना दिलासा मिळाला आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे, तर महाराष्ट्रात मात्र या लाटेचे रूपांतरण त्सुनामीत झालेले आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक प्रचंड आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातील काही जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्हा एक आहे. सतत होणाऱ्या रुग्णवाढीपुढे राज्यातील आरोग्यसेवा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. हीच परिस्थिती लक्षात घेता नागपूरमधील राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये शंभर खाटांचे कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. गुरुवार, १५ एप्रिल रोजी या कोवीड सेंटरचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

हे ही वाचा:

आमदारकीसाठी फोन, कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पत्र

उत्तर प्रदेश सरकारची परतणाऱ्या मजूरांसाठी योजना तयार

सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?

कठीण समय येता संघ कामास येतो

सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या सेंटरमध्ये सीटी स्कॅनची व्यवस्थाही आहे. लवकरच या कोविड सेंटरची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० खाटांचे असणारे हे सेंटर लवकरच २०० खाटांचे होणार आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल वेळेवर मिळण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे जेणेकरून प्रादुर्भाव आणखीन वाढणार नाही असे मत व्यक्त केले.

 

Exit mobile version