बेंगळुरू येथील एका हिंदू महिलेने स्वत:ला आणि तिच्या मुलाला संरक्षण मिळावे म्हणून पोलिसांकडे धाव घेतली आहे. कारण तिचा नवरा सदाम याला काळ्या जादूच्या विधीसाठी आपल्या ३ वर्षांच्या मुलाचा बळी द्यायचा आहे. समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणात महिलेने आरोप केला आहे की आरके पुरम पोलिसांनी २७ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. तिने २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलिसांकडे संरक्षण मागितले.
२०२० मध्ये ही महिला सदामला भेटली होती. त्यावेळी सदामने आधी ईश्वर नावाचा हिंदू असल्याचे भासवले होते. सदाम तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक असल्याने नोव्हेंबर २०२० मध्ये महिलेने आणि सदामने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. यावेळी, महिलेचा असा विश्वास होता की सदाम हा हिंदू आहे. लग्नानंतर मात्र सदामने त्या महिलेला इस्लामिक विधींनुसार पुन्हा लग्न करण्यास भाग पाडले. त्याने त्या महिलेला वचन दिले होते की ते त्यांना चांगले ठेवीन. २०२० मध्ये सदामने तिला अज्ञात ठिकाणी नेले, तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, तिला नवीन मुस्लिम नाव दिले आणि इस्लामिक विवाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.
हेही वाचा..
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम तैनात!
बंदी नंतरही फटाके फोडल्याने दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली
दीपोत्सवाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने ईदसाठीच्या हिरव्या कंदिलाला विरोध केला असता का?
छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
धर्मांतराने गैरव्यवहार थांबला नाही. निकाहनंतर सदामने केलेल्या अत्याचाराची तीव्रता वाढली. गरोदर असतानाही महिलेला सतत शारीरिक मारहाण आणि अत्याचाराला सामोरे जावे लागले. २०२१ मध्ये महिलेने त्यांच्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर सदामने तिला वारंवार सांगितले की त्यांना त्यांच्या मुलाचा एका विधीसाठी बळी द्यायचा आहे. ज्यामुळे त्यांना पैसे मिळतील. सदामला विधीसाठी तिला आणि तिच्या आईला इजाही करायची होती. अत्याचार वाढल्यानंतर तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवाच्या भीतीने, ती तुमाकुरूला गेली. सदाम आणि त्याचा मित्र, लंगडा नयाज, ज्यांच्या उपस्थितीत इस्लामिक विवाह पार पडला होता, तिच्या मागे तिच्या नवीन घरी गेले, अत्याचार केला आणि १३ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
मी पोलिसांना विनंती करते की सदाम आणि नयाज यांच्यावर त्वरित कारवाई करावी. मला माझ्या सुरक्षिततेची, तसेच माझ्या मुलाची आणि आईची भीती वाटते. मी तातडीने पोलीस संरक्षणाची विनंती करते. आमचे काही नुकसान झाले तर मी सदामला पूर्णपणे जबाबदार धरते, असे त्यांनी सांगितले आहे.
केआर पुरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने २०२१ मध्ये केआर पुरममधील तिचे घर सोडले. ती तुमाकुरू येथे राहिली आणि आता नेलमंगलाजवळ राहते. आम्ही तिची तक्रार सप्टेंबरमध्ये घेतली आणि तिचे सध्याचे निवासस्थान ज्यांच्या अधिकारक्षेत्रात आहे त्या पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. आम्ही तिला तिच्या पतीचा नंबर चौकशीसाठी देण्यास सांगितले, परंतु तिने दिलेला नंबर कनेक्ट होत नाही. ती पुन्हा स्टेशनवर आलीच नाही. तिने पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्याचेही आम्हाला माहीत नव्हते. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार आम्ही पुढील आवश्यक पावले उचलू, असे पोलिसांनी सांगितले.