25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषरामलल्लाच्या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम कुटुंब बनवत आहे 'राम नावाच्या टोप्या'!

रामलल्लाच्या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम कुटुंब बनवत आहे ‘राम नावाच्या टोप्या’!

प्रभू राम नावाच्या टोप्या बनवताना अभिमान वाटत आहे, मुस्लिम कारागीर

Google News Follow

Related

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे.प्रभू रामाच्या या कार्यात प्रत्येकाला आपली भूमिका बजावायची आहे.याच प्रमाणे अमरोहायेथील एक मुस्लिम कुटुंब अयोध्येतील भक्तांच्या डोक्यावर राम नावाच्या टोप्या तयार करण्याचे काम करत आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा शहरातील बटवाल परिसरातील हे मुस्लिम कुटुंब श्री राम लिहिलेल्या टोप्या तयार करत आहेत.या तयार झालेल्या टोप्या दिल्लीला पाठवल्या जात आहेत.मोठ्या संख्येने बनवलेल्या या जय श्री राम टोप्या भक्त परिधान करतील. अचानक जय श्री राम टोप्या बनवण्याची ऑर्डर मिळाल्यामुळे मुस्लिम कुटुंबाचे चेहरे उजळले निघाले आहेत आणि त्यांच्या हाताने बनवलेल्या श्री राम नावाच्या टोप्या अयोध्येत भाविक वापरणार असल्याने त्यांना अभिमान वाटत आहे.

हे ही वाचा:

अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत

महिला पोलिसांवरील अत्याचाराचे पत्र बनावट, पत्र व्हायरल करणाऱ्याचा शोध सुरू

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात पाच पोलीस ठार

मालदीवमधले लोकंही गुगलवर सर्च करतायत ‘लक्षद्वीप’

अमरोहा शहरातील नसीम बेगचे कुटुंब टोप्या बनवण्याचे काम करते.हे कुटुंब टोप्या बनवून आपला उदरनिर्वाह करतात.ही कुटुंबे निवडणुकीच्या काळात , सणासुदीत मोठ्या प्रमाणात टोप्या बनवून त्यांचे वाटप करतात. दरम्यान, श्री रामांच्या नावाच्या टोप्यांची ऑर्डर मिळाल्याने हे कुटुंब आनंदी आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श ठेवणाऱ्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कार्यात गुंतला आहे. महिला असो, लहान मुले असो वा वृद्ध, प्रत्येकजण स्वत:च्या हाताने टोप्या तयार करत आहेत.

गेल्या महिनाभरात या कुटुंबाने सुमारे ५० हजार टोप्या बनवून पाठवल्या आहेत. २२ जानेवारीला अयोध्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात भक्तांच्या डोक्यावर स्वत:हून बनवलेल्या टोप्या पाहण्यासाठी उत्सुक असून याचा कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे.टोप्या बनवणाऱ्या मुर्सलीन बेग यांनी सांगितले की, प्रत्येक शहरात याला खूप मागणी आहे, अयोध्येला जाणारे लोक खासकरून ही टोपी मागवत आहेत. ही टोपी खूप सुंदर दिसते, आमचे सुद्धा हेच म्हणणे आहे की, या टोप्या घालून लोकांनी अयोध्येला जावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा