25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषपंतप्रधानाच्या सुरक्षा ताफ्यात चपळ, शिडशिडीत बांध्याचा 'मुधोळ हाऊंड'

पंतप्रधानाच्या सुरक्षा ताफ्यात चपळ, शिडशिडीत बांध्याचा ‘मुधोळ हाऊंड’

पंतप्रधानांच्या ताफ्यात महाराष्ट्र मातीतील श्वान सामील होणार..

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात झेड प्लस सुरक्षितेमध्ये महाराष्ट्रातील मराठी मातीतील ‘मुधोळ हाऊंड’ जातीच्या श्वानांची निवड करण्यात आली आहे, सुरक्षितेच्या ताफ्यात पहिल्यांदाच स्वदेशी श्वानांची निवड करण्यात आली असून, यामध्ये ‘मराठा हाऊंड’ किंवा ‘मुधोळ हाऊंड’ जातींच्या श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षारक्षक एनएसजी कमांडो सोबतच हा श्वान देखील पथकात तेवढाच मोठ्या प्रमाणात महत्वाचे असतो.

यापूर्वी सुरक्षा ताफ्यात परदेशी श्वानांचा उपयोग केला जात असे, आता मात्र स्वदेशी जातींच्या श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी या श्वानांना चार महिने अत्यंत कडक प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुधोळ शिकारी श्वान सामान्यतः लांब आणि शरीराने उंच व अतिशय चपळ असतात. हे श्वान त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आजारी पडण्याची शक्यता कमी असते. ‘मुधोळ हाऊंड’ श्वानांची नजर अतिशय तीक्ष्ण असते. इतर श्वानांच्या तुलनेत ह्या श्वानांची वास हुंगण्याची क्षमता अधिक तीव्र असते. या श्वानांमध्ये कोणत्याही हवामानात काम करण्याची क्षमता आहे. मुधोळ हाऊंड श्वान हवाई दल, निमलष्करी, डीआरडीओ, राज्य पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कर्नाटकात, व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संरक्षणासाठी मुधोळ हाऊंड तैनात करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

या श्वानांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत जुन्या काळातील मराठा साम्राज्यांचा भाग असलेला ‘मुधोळ’ या गावावरून या श्वानांना हे नाव पडले आहे. त्याच प्रमाणे ह्या श्वानांना ‘मराठा हाऊंड’ असेही म्हटले जाते. इतर परदेशी श्वानांपेक्षा ‘मुधोळ जातीचे’ श्वान फार आक्रमक नसतात. परंतु लवचिक व चपळ असतात व अंगकाठी बारीक असल्याने १५-१५ फुटापर्यंत उडी मारण्यात तरबेज असतात. त्यामुळेच या श्वानांना पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. एसपीजीतील जवान त्याच्या सोबत असतो दरम्यान या श्वानाला लहान वयातच प्रशिक्षित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ‘मुधोळ हाऊंड’ जातीच्या श्वानांचा शिकारीसाठी समावेश केला जात असे. आता त्यांच्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षेची नवी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा