महाराष्ट्र मधील सोलापूरची हृतिका श्रीराम हिने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महिलांच्या डायव्हिंग प्रकारात सुवर्ण पदक जिंकले असून, या स्पर्धेत हृतिकाचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. तसेच हृतिका ही दोन वर्षाच्या मुलाची आई असून. दसऱ्याच्या दिवशी हे सुवर्ण पदक मिळवले आहे. मध्यंतरी मातृत्वामुळे हृतिका या डायव्हिंग स्पर्धापासून दूर झाल्या होत्या. मात्र कोरोना नंतर पुन्हा सरावाला सुरुवात केल्या नंतर, हृतिका यांची ही पहिलीच स्पर्धा होती.
राजकोट येथील सरदार पटेल अक्वेटिक संकुलात ही स्पर्धा सुरू होती. तिने दहा मीटर प्लॅटफॉर्म प्रकारात १७९.३० गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच या आधी तिने स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. हृतिका यांचे राष्ट्रीय स्पर्धेत हे १० वे पदक आहे. दसऱ्याच्या दिवशी हे सुवर्णपदक जिंकले असून याचा जास्त आनंद झाला आहे. तसेच हे सातत्य कायम टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. असे हृतिका यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
हृतिका या साडेचार वर्षापासून जलतरणाचा सराव करत आहेत. तसेच २०१० मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टोकियो येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हृतिका यांनी ब्रॉझ पदक जिंकले असून भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या हृतिका यांचे घराणे सुद्धा जलतरण क्रीडाप्रकाराला वाहिलेले आहे. आई बहीण-भावंड हेही राष्ट्रीय विजेते स्पर्धक आहेत. तसेच रेल्वेमध्ये कार्यरत असणारे पती हर्षवर्धन हेही राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. हृतिका यांच्या कडून डायव्हिंगमध्ये शेवटच्या क्षणी चुका झाल्यामुळे सुवर्ण पदक निसटण्याची शक्यता होती. पण शेवटी हृतिका यांनी साध्य करून दाखवले.