बिहारमध्ये एका १६ वर्षीय मुलीवर मौलवी कारी शाहनवाजने नियमितपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याशिवाय तो मुलीला कुराणवर शपथ द्यायचा आणि तिने कोणालाही सांगितल्यास अल्लाह तिला माफ करणार नाही, अशी धमकी द्यायचा. या मौलवीने एका वर्षाहून अधिक काळ तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित मौलवी हा मुलीला वर्ग संपल्यानंतर मागे राहण्यास भाग पाडायचा. तिने कोणाशीही बोलू नये म्हणून मौलवीने तिला चाकूचा धाक दाखवला आणि त्यामुळे भीतीने ती शांतपणे हा प्रकार सहन करत होती. मात्र, ती सात महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचा संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा..
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानवरून आणली जाणार होती शस्त्रे
इस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप
हे प्रकरण मधुबनी जिल्ह्यातील खुटौना पोलीस स्टेशन हद्दीत घडले आहे. संशयित मौलवी हा मदरशाचा प्रमुख आहे. या अल्पवयीन मुलीच्या आईने सांगितले की, त्याने कुराणाचा आधार घेत या कृत्याबद्दल कोणाला माहिती दिली तर अल्लाह तिला शिक्षा करेल, असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. मौलवींनी मुलीला चाकूचाही धाक दाखवला. कुटुंबियांना मुलीच्या शरीरात दिसणारे बदल लक्षात आले आणि चौकशीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
खुटौना पोलिस स्टेशनचे प्रभारी नितीश कुमार यांनी सांगितले की, एफआयआर नोंद करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. या प्रकारमुळे स्थानिक संतप्त झाले असून त्यांनी मौलवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त झालेल्या लोकांनी मदरशालाही टाळे ठोकले आहे.