हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन

हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठा’चे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवार, १७ मार्च रोजी दुपारी हा मोर्चा निघणार असून विद्यापीठ नामांतराची मागणी लावून धरण्यात येणार आहे.

‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतराची मागणी जोर धरत असून विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी नाव असल्याने ही मागणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्याने नामांतराची मागणी केली जात आहे. ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त आणि हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त होत आहे. काही शहरे, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त स्वरूपात करण्याची आग्रही मागणी केली जात आहे.

हे ही वाचा:

देशासाठी धोकादायक असलेल्या नार्को दहशतवादाला आळा घालणे महत्त्वाचे

साडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!

औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?

भारतीय संरक्षण उद्योगाची गरुडभरारी

नामांतराच्या मागणीसाठी सोमवार, १७ मार्च रोजी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ३ वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात दसरा चौक येथून होणार आहे. या मोर्चामध्ये तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचे वंशज सहभागी होणार आहेत.

दिनांक- सोमवार, १७ मार्च २०२५

वेळ- दुपारी ३ वाजता

मोर्चाचा मार्ग- दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

Exit mobile version