त्याची लाकडी ट्रेडमिल पाहून ‘आनंद’ झाला!

त्याची लाकडी ट्रेडमिल पाहून ‘आनंद’ झाला!

फिटनेस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता विजेशिवाय चालू शकणारी ट्रेडमिल आली आहे. तेलंगणातील एका व्यक्तीने विजेशिवाय चालणाऱ्या लाकडी ट्रेडमिलची रचना केली आहे. या ट्रेडमिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेडमिलची दखल खुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा आणि तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी घेतली आहे.

१७ मार्च रोजी ट्विटर वापरकर्ता अरुण भगवथुला यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओला कॅप्शन दिले, ‘विजेशिवाय काम करणारी अद्भुत ट्रेडमिल.’ व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप समोर आलेली नाही. हा ४५ सेकंदाचा क्लिप व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ३६ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस ट्रेडमिल तयार करण्यासाठी त्याच्या सुतारकाम कौशल्याचा वापर करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो माणूस सहजपणे दाखवतो की ही ट्रेडमिल कशी काम करते. तो लाकडी हँडल पकडतो आणि बेल्टप्रमाणे जोडलेल्या भागांवर पाय चालवतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाकडी ट्रेडमिल कोणत्याही विजेचा वापर न करता चालते.

हे ही वाचा:

महेंद्रसिंग धोनीने सोडले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद

‘परीक्षेचा हिजाब वादाशी संबंध नाही’, तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

परमबीर प्रकरणातील तपास सीबीआयकडे! ठाकरे सरकारला आणखीन एक दणका

ठाकरे सरकारच्या मतांना न्यायालय दाखवते केराची टोपली

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या ट्रेडमिल करण्याऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. आणि महिंद्रा यांनी हे फक्त ट्रेडमिल नसून ही एक कला आहे असे म्हटले असून स्वतःसाठी असच एका ट्रेडमिलची मागणी त्यांनी केली आहे. तसेच तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटी रामाराव यांनीही ट्रेडमिलच्या निर्मात्याचे कौतुक केले आहे. त्यांनी त्या माणसाला अधिक ट्रेडमिल बनविण्यात मदत करण्याचे आव्हान दिले आहे.

Exit mobile version