एक माणूस तीर्थयात्रे वरून परत येताना कल्याणला बेपत्ता झाला ही विचित्र घटना समोर आली आहे. मूळ केरळचा रहिवासी असणारा हा माणूस नकळत रात्री कल्याणला उतरला आणि बेपत्ता झाला.
क्रिष्णन नम्बूथिरी असे ह्या व्यक्तीचे नाव असून ते अयोध्या, काशी इथे तीर्थयात्रे साठी गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब आणि १०० लोकांचा समूह गेला होता . तिथून परत येताना त्यांनी मुंबई शहर गाठलं आणि मुंबईवरून ते केरळला जाणार होते. मुंबईतील त्यांचे गंतव्य कुर्ला होते. रात्री २ वाजल्याने अंधार झालेला होता. अंधार असल्यामुळे ते नकळत कुर्ल्याच्या जागी कल्याण येथे उतरले. ह्या गोष्टीची कल्पना त्यांच्या कुटूंबाला नव्हती. सकाळी ट्रेन कुर्ल्याला पोहोचल्यावर त्याच्या कुटुंबाला या गोष्टीची जाणीव झाली. १०० लोकांमधून काही लोकं त्यांना शोधायला परत कल्याणला गेले. क्रिष्णन ह्यांच्या पत्नींना केरळचा प्रवास सुरु ठेवण्यास सांगितले गेले.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
कल्याणला गेलेल्या लोकांनी रेल्वे पोलिसांची मदत घेतली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली आणि त्यांना क्रिष्णन ट्रेन मधून उतरताना दिसले. पण त्यानंतर त्यांचा कुठेही पत्ता नव्हता. त्यांचे फोटो वॉट्सअप आणि मुंबईतील सगळ्या रेल्वे पोलीस चौक्यांमध्ये पाठवले गेले.थोड्या वेळानंतर मुलुंड रेल्वे पोलिसांना प्रदान केलेल्या वर्णनासारखा माणूस सापडला. क्रिष्णनला लगेचच मुलुंड वरून कल्याणला पोहोचवण्यात आले. कल्याणहुन त्यांनी त्यांचा केरळ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. क्रिष्णनच्या अनुसार तो कधीही मुंबईला आला नव्हता. कल्याणहून तो मुलुंडला कसा पोहोचला हे त्यालाही माहित नव्हते. कल्याणमध्ये राहणारे क्रिष्णनचे नातेवाईक संतोष एम म्हणाले, “त्याने आम्हाला सांगितले आहे की तो कल्याण येथे ट्रेनमधून का खाली उतरला आणि त्यानी मुलुंडपर्यंत प्रवास कसा केला हे देखील माहित नाही.. पण आम्ही कल्याण रेल्वे पोलीस अधिकारी मुकेश ढगे ह्यांचे आभारी आहोत. ढगे यांनी त्याचा शोध घेण्यास मदत केली. आम्ही त्याच्यासाठी खूप काळजीत होतो.”