पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात अनेकजण भटकायला जात असतात. अश्या ठिकाणी अनेक प्राणी पक्षी असतात. पर्यटक त्या प्राण्यापक्षांसोबत खेळतात त्यांना खाऊ देतात. असंच महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर माकडाला खायला देत असताना एक पर्यटक दरीत पडला आहे. सुदैवाने त्या पर्यटकाला अथक प्रयत्नांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीतून बाहेर काढले आहे.
संदीप नेहते हे पुण्याचे रहिवासी असून, ते त्यांच्या कुटुंबासोबत हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. हरिहरेश्वर येथून ते आंबेनळी घाट रस्त्यामार्गे महाबळेश्वर पर्यटनास येत होते. त्यांना जननी माता मंदिरावरील बाजूस रस्त्यानजीक असलेल्या कठड्यावर काही माकडे दिसली. त्या माकडांना चिप्स देण्यासाठी संदीप दरीच्या कठड्यावर उभे होते. पावसामुळे कठड्यावर शेवाळ होते. त्या शेवाळावरून संदीप यांचा पाय घसरून ते थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले. याची माहिती महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवानांना समजताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक
… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले
शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन
तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी संदीप यांना सुखरूप दरीबाहेर काढले आहे. बाहेर काढल्यानांतर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे पाठविण्यात आले.