देशातील कांदा उत्पादकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर करत कांदा निर्यातीला हिरवा झेंडा दाखविला आहे. यानुसार, ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळणार आहे.
केंद्र सरकारने सहा देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली असून कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशिअस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. २ हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती आणि काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Centre allows export of 99,150 MT onion to six countries Bangladesh, UAE, Bhutan, Bahrain, Mauritius and Sri Lanka. pic.twitter.com/rQuo2APFoP
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2024
दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यावरुन, विरोधकांनी आरोप करत महाराष्ट्र आणि गुजरात असा मुद्दा केला होता. अखेर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने योग्यवेळी हा निर्णय घेतला असून उन्हाळी कांदा अजून शेतात आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील कांदा उत्पादकांना होणार आहे, असं बोललं जात आहे.
हे ही वाचा:
भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली
नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं
मनी लाँडरिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेकडून २५ कोटी लुबाडले
मुकेश दलाल यांच्या विजयामुळे काँग्रेसचा तिळपापड, निलेश कुंभानी सहा वर्षांसाठी निलंबित!
केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी ३१ मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ३१ मार्चनंतरही पूर्ण बंदी उठवली नव्हती. मित्र देशांना काही प्रमाणात कांदा निर्यात केला जात होता. दरम्यान, मित्र देशांना आत्तापर्यंत सरकारनं ७९,१५० टन कांद्याची निर्यात केलीय.आता, आणखी सहा देशांत कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.