देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. सरकार तर्फे ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे, स्वातंत्र्यदिनाला अवघे काही दिवस उरले असतानाच जम्मू काश्मीर आणि देशाच्या सीमेलगतच्या भागात मोठी कारवाई झाल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या झटापटीमध्ये भारतीय सैन्यदलातील तीन जवान शहीद झाले.
लष्कराला गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार देशात सर्व संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रेल्वे स्थानकांपासून ते सार्वजनिक ठिकाणांपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्या सुरक्षा यंत्रणांनी करडी नजर ठेवली आहे. पण, कडेकोट बंदोबस्त असतानाही दहशतवाद्यांच्या कुरापती थांबत नसल्याची घटना घडली आहे.
पुढच्या चार दिवसांत देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे, त्या आधीच लष्कराने दहशतवाद्यांच्या कट हाणून पडला आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी भागात असणाऱ्या परगल या भागात लष्कराच्या तळावर दोन दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. लष्कराकडून या दहशतवाद्यांचा ठार केले आहे. या झटापटीमध्ये भारतीय सैन्यदलातील तीन जवान शहीद झाले.
ही वाचा:
नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?
राजौरीपासून २५ किलोमीटर असंतरावर असणाऱ्या लष्कराच्या तळावर हा हल्ला करण्यात आला. पण, वेळीच उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा हा कट उधळला गेला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर या भागात लष्कराने शोधमोहिम हाती घेतली आहे.