प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळ येत आहे.२२ जानेवारी रोजी अयोध्येत हा सोहळा पार पडणार आहे.देशभरातील भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अयोध्येत सोहळ्याची तयारी जोरदार सुरु आहे.सोहळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आणि प्रसादाची सोय मंदिर ट्रस्टीकडून करण्यात आली आहे.याच दरम्यान, अजमेर येथून आठ चपात्या बनवणाऱ्या मशिन्स अयोध्येला रवाना झाल्या आहेत.
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी सोमवारी अजमेर येथून या मशिन्स अयोध्येला रवाना केल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिराचे काम होत आहे.अयोध्या शहर हे जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनणार आहे.अजमेर येथून पाठवण्यात आलेल्या या चपाती बनवणाऱ्या मशीन अयोध्येतील माँ सीता भोजन शाळेत पोहचणार आहेत.वासुदेव देवनानी यांनी सांगितले की, या मशिन्सचे वैशिष्ट असे आहे की, या आठ मशीन्समधून एकावेळी १२०० चपात्या तयार होतात .याशिवाय अजमेरचे ५० कर्मचारीही येथे कार्यरत असल्याचेही वासुदेव देवनानी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘आप’चा काँग्रेसला दिल्लीतील तीन जागांचा प्रस्ताव!
संरक्षणापासून आरोग्यापर्यंत… भारताने मालदीवशी नेहमीच पाळला शेजारधर्म!
मालदीवप्रकरणी चीनने खुपसले नाक
उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
तसेच ३६१० किलो वजनी आणि १०८ फूट लांब अगरबत्ती गुजरातहून अयोध्येला आणली जात आहे.सोमवारी अगरबत्तीचा ट्रेलर भरतपूरच्या आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावरून अयोध्येकडे रवाना झाला आहे.गुजरातमध्ये या अगरबत्तीची निर्मिती करण्यात आली असून ती बनवण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी लागला आहे.