31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषगेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!

गेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमध्ये विविध विकास योजनांचे भूमिपूजन, उद्घाटन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ सप्टेंबर) गुजरात दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये विविध विकास योजनांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. त्यानंतर जनतेला संबोधित करत आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान मोदी म्हणाले, या काळात माजी खूप थट्टा करण्यात आली, अपमान देखील करण्यात आला. पण मी ध्येय साध्य करण्यासाठी शांतपणे सर्व काही सहन करत सतत काम करत राहिलो.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ६० वर्षानंतर देशातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. एकाच  सरकारला सलग तिसऱ्यांदा देशसेवा करण्याची संधी दिली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी ही मोठी घटना आहे.

तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसात देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेतले जातील, अशी हमी निवडणुकीच्या पूर्वी मी दिली होती. या १०० दिवसात मी दिवस पाहिली ना रात्र. १०० दिवसांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. देश असोवा परदेश, जे काही प्रयत्न करावे लागतील ते केले, कोणतीच कसर सोडली नाही.

हे ही वाचा : 

महाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे…

राहुल गांधी, काँग्रेस जम्मू-काश्मीरला दहशतवादाकडे ढकलू इच्छितात!

तालिबानी सरकारला नको पोलिओ लसी; आणली स्थगिती

कावड यात्रेला विरोध केल्याने हिंदूंनी ईदची मिरवणूकही रोखली !

विरोधक आपली खिल्ली उडवत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, मी माझ्या कामात व्यस्त राहिलो, मौन बाळगले. गेल्या १०० दिवसांत कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या हे तुम्ही पाहिलंच असेल. माझी चेष्टा करत होते, तर्क-वितर्क लावून मजा घेत होते. एवढा अपमान होवून देखील मोदी शांत का ?, याचे लोकांनाही आश्चर्य वाटले.

ते पुढे म्हणाले, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जन्मभूमीमध्ये जन्मलेला हा मुलगा आहे. प्रत्येक गोष्टीची चेष्टा, अपमान सहन केला आणि शपथ घेत १०० दिवसांचे धोरण बनवण्यात, जनतेच्या कल्याणाचे निर्णय घेण्यात व्यस्त राहिलो. अशा टिंगल-टवाळी करणाऱ्यांना उत्तर न देण्याचे मी ठरवले. देशाच्या कल्याणासाठी मला ज्या मार्गावर चालायचे आहे, त्यावरून जर कोणी टिंगल केली तरी मी माझ्या मार्गावरून हटणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या कल्याणासाठी चालू करण्यात आलेल्या योजनांचीही माहिती पंतप्रधानांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा