26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष...आणि स्वयंचलित पट्ट्यावर चढलेल्या लहानग्याला वाचविले

…आणि स्वयंचलित पट्ट्यावर चढलेल्या लहानग्याला वाचविले

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वयंचलित बॅगपट्ट्यावर एक लहानगा मुलगा चढल्याने गोंधळ उडाला. स्वयंचलित बॅगपट्ट्याजवळील बंदिस्त जागेत हा चिमुकला अडकून अपघात होण्याची शक्याता असतानाच पट्टा चालवणाऱ्या ऑपरेटरच्या प्रसंगावधानामुळे लहान मुलाचा जीव वाचला.

प्रवासी विमानतून प्रवास करून बाहेर आले, की त्यांचे सामान ‘रिक्लेमर बेल्ट’च्या मदतीने त्यांना घेता येते. एक कुटुंब आपल्या चार वर्षांच्या मुलासह उदयपूर येथून आपला प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. लहानग्याचे पालक इतर कामात व्यस्त असताना हा लहानगा मस्ती करत या स्वयंचलित बॅगपट्ट्यावर चढला. त्या वेळी हा पट्टा प्रवाशांच्या सामानासह वेगाने फिरत होता. महत्त्वाचे म्हणजे हा पट्टा एका लहान बंदिस्त कक्षात जातो आणि तिथून पुन्हा बाहेर येतो. लहान मुलगा जिथून या पट्ट्यावर चढला तो भाग या बंदिस्त कक्षाच्या अगदीच जवळ होता. पुढील काही सेकंदातच हा लहान मुलगा त्या कक्षात जाऊन गुदमरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

हे ही वाचा:

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

या घटनेमुळे विमानतळाच्या आगमन भागात प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्या वेळेस या स्वयंचलित पट्ट्याचे कार्यान्वयन नीरज निंबाळकर हे करत होते. प्रवाशांमधील गोंधळाकडे लक्ष जाताच निंबाळकर यांनी त्वरित तो पट्टा बंद केला आणि आपत्कालीन चमूला देखील बोलावले. अखेर त्या चिमुकल्याला पट्ट्यावरून खाली उतरवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. निंबाळकर यांच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात टळला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा