बीडमधील मशिदीत स्फोट !

पोलिसांकडून तपास सुरु 

बीडमधील मशिदीत स्फोट !

बीड जिल्ह्यात पहाटे एका मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अर्धामसला गावातील मशिदीत घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गावातील स्थानिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील मशिदीत रात्रीच्या ३ वाजण्याच्या सुमारास गावातील दोन युवकांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे अशी आरोपींची नावे आहेत. स्फोट घडल्यानंतर फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या स्फोटामुळे मशिदीच्या फरशी आणि भिंतींना भेगा पडल्या असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधानांकडून आद्य सरसंघचालकांना आदरांजली!

Chaitra Navratri : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

जाणून घ्या काय आहे १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन UPI ​​नियम

महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन

या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. विहिरीमध्ये खोदकाम करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या जिलेटीन कांड्यांचा वापर करून आरोपींनी हा स्फोट घडवून आणला. विशेष म्हणजे, स्फोट घडवून आणण्यापूर्वी आरोपींनी सोशल मिडीयावर एक रील्स बनवून शेअर केली होती, ज्यामध्ये आरोपीच्या हातात जिलेटीनच्या कांड्या आणि सिगारेट होती. ‘शिस्तीत रहा, बेट्या मी अंगार, भंगार नाय रे’, असे गाणे लावून आरोपींनी रील्स पोस्ट केली होती. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी शोध घेत दोनही आरोपींना बेड्या ठोकल्या आणि कोर्टात हजर केले. कोर्टाने दोनही आरोपींना ३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

करियर - AI = ??? |Amit Kale |  डॉ. दीपक शिकारपूर

Exit mobile version