बांगलादेशातील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिकत असलेल्या उत्सब कुमार गियान नावाच्या एका हिंदू विद्यार्थ्याला मुस्लिम समाजाच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
उत्सबने प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात सोशल मीडिया ग्रुपवर ‘अपमानास्पद संदेश’ पोस्ट केला आणि नंतर तो हटविला असा आरोप आहे. या आरोपावरून त्याला मारहाण केली. हा प्रकार २६ मे रोजी घडला. यानंतर मुस्लीम समाजाच्या जमावाने उत्सबला लेखी कबुलीजबाब देण्यास भाग पाडले.
हेही वाचा..
लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई
लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त
एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले
ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं
या प्रकारानंतर उत्सबला त्याच जमावाने पुन्हा निर्दयीपणे मारहाण केली आणि नंतर त्याला बांगलादेशच्या ढाका विभागातील गोपालगंज सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची प्रकृती आता गंभीर आहे. त्यामुळे नंतर त्याला खुलना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यादरम्यान, उत्सबवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर शिक्षा आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून कायमची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबद्दल सध्या उत्सब हा बेशुध्द असल्याचे सांगण्यात आले.
याबद्दल बोलताना गोपालगंज सदर पोलीस ठाण्याचे ओसी म्हणाले, आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला आधी बरे होऊ द्या. त्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू.