24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषलहान मुले सोबत असलेल्या महिलांना मध्य रेल्वेची 'भेट

लहान मुले सोबत असलेल्या महिलांना मध्य रेल्वेची ‘भेट

मध्य रेल्वेने मुंबईतील सात प्रमुख स्थानकांवर नर्सिंग पॉड सुरू करण्याची योजना आखली आहे.

Google News Follow

Related

सरासरी ३५ लाख लोक दररोज मध्य रेल्वेची सेवा वापरतात आणि त्यापैकी सुमारे २० टक्के महिला आहेत. आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु मध्य रेल्वेने या महिलांसाठी एक उत्तम योजना आखल्याने ही समस्या जवळपास सुटली आहे. या समस्यांचे उत्तर आहे ‘नर्सिंग पॉड्स’.

मध्य रेल्वेने मुंबईतील सात प्रमुख स्थानकांवर नर्सिंग पॉड सुरू करण्याची योजना आखली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना त्यांच्या मुलांना स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायक झोन तयार करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पॉड मध्ये मातांना स्वच्छतागृहे किंवा इतर जागा वापरण्याऐवजी स्तनपान आणि पंपिंगसाठी जागा दिली जाते. हे नर्सिंग पॉड्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, कल्याण ठाणे आणि अनेक स्थानकांवर उघडण्यात येतील.

माहितीनुसार प्रत्येक पॉडमध्ये आरामदायी, उशी असलेली बसण्याची जागा, डायपर बदलणारे स्टेशन, एक पंखा, एक लाईट आणि डायपरसाठी डस्टबिन यांचा समावेश असेल. . पॉडच्या बाजूंना परवानाधारकाच्या जाहिराती असतील आणि त्या दिसायला आकर्षक केल्या जातील. पॉडची देखभाल आणि सुरक्षा ही परवानाधारकाची जबाबदारी असेल.

हे ही वाचा:

पदयात्रेच्या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी जाणार का सुट्टीवर?

चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य

‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’

हे नर्सिंग पॉड भारतीय रेल्वेच्या नॉन-फेअर महसूल धोरणांतर्गत स्थापन केले जातील. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी या सेवा मोफत उपलब्ध असतील. या योजनेंतर्गत सीएसएमटी येथे एक नर्सिंग पॉड, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी तीन, ठाणे आणि लोणावळा येथे प्रत्येकी दोन आणि कल्याण आणि पनवेल येथे प्रत्येकी एक नर्सिंग पॉड उभारण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा