उत्तर प्रदेशात चार हात- चार पायाच्या मुलाचा जन्म

उत्तर प्रदेशात चार हात- चार पायाच्या मुलाचा जन्म

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाचा जन्म झाला आहे. त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी लोटली आहे. ६ नोव्हेंबरला या बाळाचा जन्म झाला. तीन मुलीनंतर या मुलाचा जन्म झाला आहे. त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती रुग्णालयाचे बालरोगविभागाचे प्रमुख डॉ. नवरतन गुप्ता यांनी दिली.

मुलाची प्रकृती आता ठीक आहे. हा प्रकार जुळ्या मुलांमध्ये गुंतागुंत झाल्यास आढळून येतो. एक मुलाचा गर्भामध्ये संपूर्ण विकास झाला. तर, दुसऱ्या मुलाचा विकास नीट होऊ शकला नाही. या दुसऱ्या मुलाच्या केवळ शरीराच्या अर्ध्या भागाचा विकास होऊ शकला. धडाच्या वरच्या भागाचा विकास होऊ न शकल्यामुळे तो भाग संपूर्ण विकसित झालेल्या मुलालाच चिकटला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे एका मुलाला चार हात आणि पाय आहेत, असे दिसते. मात्र उर्वरित दोन हात आणि पाय दुसऱ्या अविकसित न झालेल्या मुलाचे आहेत.

हे ही वाचा: 

कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट; ५८० सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून दुसरे समन्स

सौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट

वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर

हा प्रकार ५० ते ६० हजारांमध्ये केवळ एकामध्ये दिसून येतो, असे डॉक्टरांनी सांगितले. या बाळाचे अतिरिक्त अवयव शस्त्रक्रिया करून वेगळे केले जातील. सध्या या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुलाला ट्युबच्या साह्याने दूध पाजले जात आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलगा ठीक होईल, असे सांगितले जात आहे. या मुलाचा जन्म घरातच झाला होता. गावातील प्रसूती करणाऱ्या महिलेने ही प्रसूती केल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

Exit mobile version