ईशान्येकडील मणिपूरमध्ये सध्या हिंसक वातावरण आहे. या तणावग्रस्त भागातून बाहेर पाडण्यासाठी लोकांची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. मणिपूरमध्ये असलेले परराज्यातील नागरिक आपापल्या घरी पुन्हा येऊ पाहत आहेत. अशातच विमान खर्चाच्या रकमेत आठ पटींनी वाढ झाली आहे. इंडिगो आणि एअरएशियासह अनेक विमान कंपन्यांनी सेवांच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांच्या भाड्यात वाढ केली आहे.
साधारणपणे, इंफाळ आणि कोलकाता दरम्यानचे एका वेळेचे विमान भाडे हे अडीच हजार ते पाच हजार रुपये इतके असते. साधणार इतकेच दर इंफाळ ते गुवाहाटी या विमान प्रवासासाठीही लागू होतात. परंतु, मणिपूरमध्ये जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून, इंफाळ ते कोलकाता आणि इंफाळ ते गुवाहाटी या दोन्ही मार्गांवरील विमान सेवांचे दर तब्बल आठ टक्क्यांनी वाढले आहेत. या मार्गावरील एका वेळेच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे १२ हजार ते २५ हजार रुपये इतके आहे. तर, इंफाळ ते गुवाहाटी या प्रवासासाठी १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
हे ही वाचा:
गणेश नाईकांना बलात्कार प्रकरणात अडकविण्याची दिली सुपारी
इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार
अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!
मणिपूरमध्ये कुकी आदिवासी गटाने काढलेल्या निषेध मोर्चामुळे अशांतता उफाळून आली. मणिपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आदेशात राज्य सरकारला मैतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) यादीत समावेश करण्याच्या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.