अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ

अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ

श्रीवर्धन तालुक्यात स्थानिक व्यापाऱ्याने २ लाख ६१ हजारांची खरेदी केली आणि खरेदी झाल्यावर सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले.

श्रीवर्धन तालुक्याच्या जीवना बंदरावर मासेमारीसाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यात २२ किलोचा घोळ मासा अडकला. २२ किलोचा हा मासा एका स्थानिक व्यापाराने २ लाख ६१ हजारांना विकत घेतला. मच्छीमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे आणि हेमंत चुनेकर यांनी जीवना बंदरावर मासेमारीसाठी जाळे लावले होते. काहीच वेळात जाळीवर जोरदार हिसका बसला. जोरदार बसलेल्या हिसक्यामुळे जाळीत मोठा मासा अडकल्याची खात्री मच्छीमारांना झाली. मच्छीमारांनी जाळीत अडकलेला तब्बल २२ किलोचा मासा बंदरावर आणला.

बंदरावर आणून घोळ माश्याला बोली लावण्यात आली. श्रीवर्धन येथील व्यापारी तोडणकर यांनी हा मासा २ लाख ६१ हजारांना विकत घेतला. मोठी बोली लागल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा मासा मुंबईतील मासळी बाजारांत पाच ते सहा लाखांना विकला जाण्याची शक्यता आहे असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

भारतात विदेशी नागरीकांचे लसीकरण

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले

घोळ माशाचा उपयोग हा वैद्यकीय क्षेत्रात होतो. शल्यचिकित्सा करताना वापरण्यात येणारा धागा म्हणजेच टाके घालताना वापरण्यात येणारा धागा हा घोळ माशाच्या जठर फुफ्फुसापासून तयार केला जातो. यासाठी घोळ माशाला मोठी मागणी आणि किंमत आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात घोळ मासा समुद्र किनारी असतो अशी माहिती मच्छीमारांनी दिली आहे.

Exit mobile version