हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आणि मंडीमधील बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामाची प्रकरणे समोर आल्यानंतर आता राज्यभरातून अशा मशिदी असल्याच्या बातम्या येत आहेत. याच मालिकेत हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात बेकायदेशीर मशिदीचे बांधकामही समोर आले आहे. सरकारी जागेवर कब्जा करून मशीद बांधली जात असल्याचा आरोप हिंदू संघटनेने केला आहे.
बिलासपूरच्या घुमरविनमध्ये मशिदीचे बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घुमरविन येथील बद्दू परिसरातील सरकारी जमिनीवर मशीद बांधली जात असून, त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप हिंदू जागरण मंचने केला आहे.
घुमरविनमधील हिंदू जागरण मंचचे पदाधिकारी विशाल नड्डा यांनी या प्रकरणी सांगितले की, या मशिदीचे मौलवी सहारनपूरचे रहिवासी आहेत. येथे मजूर आणून ते ही मशीद बांधत आहे. ज्या जमिनीवर मशीद बांधली जात आहे, त्यातील काही भाग ही त्यांची मालकी आहे, बाकीची सरकारी जमीन आहे.
हे ही वाचा :
भारताच्या परकीय चलन गंगाजळीचा नवा उच्चांक!
राहुल गांधींच्या विरोधात दलित समाजाकडून ‘जोडे मारो आंदोलन’
पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला !
ते पुढे म्हणाले, घुमरविनमध्ये मुस्लिम लोकसंख्या खूपच कमी आहे, परंतु त्यापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी मशीद बांधली जात आहे. ऑपइंडियाच्या बातमीनुसार, विशाल नड्डा यांनी सांगितले की, घुमरविनमध्ये मुस्लिम लोकसंख्या पाच वर्षांपूर्वी ९१७ होती, जी आता सुमारे १५०० पर्यंत वाढली असेल. मात्र, मशीद तीन मजली बांधली जात आहे. घुमरविन नगरपालिकेकडे या मशिदीबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी संगितले.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा भाग पूर्वी त्यांच्या ताब्यात आला नव्हता, त्यामुळे कोणतीही नोंद नाही. मशिदीच्या बांधकामाबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचेही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी आता हिंदू जागरण मंच जुन्या नोंदी तपासत आहे. या मशिदीवर कारवाईची मागणी करणार असल्याचे हिंदू जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या भागातील मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचेही मंचाने म्हटले आहे.