मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याचे नशीबच चमकले आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात शेतकरी मुलायम सिंह उत्खनन करत असताना, त्याला पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हिरा शोधला आहे.
पन्ना जिल्हा हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. मुलायम सिंह यांना १३. ४७ कॅरेट वजनाचा उच्च दर्जाचा हिरा या खाणीत सापडला, तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. साथीदारांसह जमीन खोदताना त्यांना आणखी सहा छोटे हिरे सापडले आहेत. लिलावातून मिळणारी रक्कम सरकारी रॉयल्टी आणि कर कापून शेतकऱ्याला दिली जाईल.
डायमंड ऑफिसचे अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या हिऱ्याची बाजारातील किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे, परंतु सरकारी निर्देशांनुसार लिलावात खरी किंमत निश्चित केली जाईल. मुलायमसिंह यांना किती रक्कम मिळेल असं विचारले असता, हिरा कार्ययलाने सांगितले की, लिलावात झालेली रकमेतून १२ टक्के रक्कम कापून सर्व रक्कम शेतकऱ्याला दिली जाणार आहे.
हे ही वाचा:
मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक
सीडीएस बिपीन रावत यांचे अपघाती निधन
सत्ताधाऱ्यांचा ८४० कोटींचे प्रस्ताव आणण्याचा डाव भाजपाने उधळला
हेलिकॉप्टर दु्र्घटनेतील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू
मुलायमसिंह म्हणाले की, त्यांचे सहा भागीदार आहेत आणि ते हिऱ्यांच्या लिलावाची रक्कम त्यांच्याबरोबर समान प्रमाणात विभागतील. हा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पन्ना जिल्ह्यात १२ लाख कॅरेटचा हिऱ्यांचा साठा असल्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश सरकार, पन्ना हिरा राखीव क्षेत्रामध्ये स्थानिक शेतकरी आणि मजुरांना हिऱ्यांची खाण उत्खननसाठी भाडेतत्त्वावर जमिनीचे छोटे तुकडे देते.