विधानभवनाजवळ एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी या शेतकऱ्याला आत्मदहनापासून परावृत्त केले आहे. तसेच त्याच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे. सुभाष देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (वय ४५) यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सुभाष यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आग विझवत देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन
जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?
डान्सर सपना चौधरीला होणार अटक?
सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू
विधान भवन परिसरातील आत्मदहन प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असेही सांगितले आहे.