मंगळवारी शेअर बाजार १०५३.१० अंकांनी घसरून ७०,३७०.५५ वर आला आहे तर एनएसी निफ्टी५० ३३३ अंकांनी घसरून २१,२३८.८० वर आला आहे. बाजार निर्देशांक झपाट्याने घसरल्याने चिंता वाढल्याचे चित्र होते.
एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये सतत घसरण झाल्याने हेवीवेट बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. निफ्टी बँक निर्देशांक २.२ टक्क्यांहून अधिक घसरला होता, तर निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी घसरला होता.निफ्टी मीडिया इंडेक्स १२ टक्क्यांहून अधिक घसरल्याने शेअर बाजार खाली आला. सोनीच्या इंडा युनिटसोबतचा १० अब्ज डॉलरचा विलीनीकरण करार रद्द झाल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस (झी) च्या शेअर्समध्ये तब्बल ३३ टक्क्यांची घसरण झाल्याने हे चित्र निर्माण झाले.
हेही वाचा..
बीसीसीआयकडून ‘डब्ल्यूपीएल’चे वेळापत्रक जाहीर
गडचिरोलीत नाव पालटून सहा महिला बुडाल्या
कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
सोनीने सोमवारी अपुऱ्या मागण्यांचे कारण देत झीसोबतचा करार रद्द केला. तथापि, झीने सोनीचे दावे नाकारले आहेत. सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि डॉ रेड्डीज हे निफ्टी५० वरचे पाच लाभधारक होते. दुसरीकडे इंडसइंड बँक, कोल इंडिया, एसबीआय लाईफ, ओएनजीसी आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले. एसएएस ऑनलाइनचे संस्थापक आणि सीईओ श्रेय जैन म्हणाले, जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक गती दिसून आली तरीही आज बाजारात मोठ्या प्रमाणात नफा कमावला गेला आहे. तांत्रिक दृष्टीकोनातून निफ्टीवर विक्रीचा दबाव आहे. हा कल आगामी सत्रांमध्ये कायम राहू शकतो.