गुजरातच्या जामनगरमधील प्रसिध्द कार्डियोलॉजिस्ट गौरव गांधी यांचे मंगळवार, ६ जून रोजी निधन झाले. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गौरव गांधी हे हार्ट स्पेशालिस्ट होते त्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. गौरव गांधी यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत १६ हजाराहून अधिक रुग्णांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली होती. काही वर्षांमध्येच त्यांनी रुग्णसेवेचा हा टप्पा गाठला होता. तसेच फेसबुकवर ‘हाल्ट हर्ट अटॅक’ अभियानात देखील त्यांचा सहभाग होता. सोशल मीडियाच्या माध्यामातून तसेच सेमिनारमधून ते हृदयाशी संबंधीत समस्यांबद्दल जनजागृतीचं काम देखील करत होते.
गौरव गांधी हे रोजच्या त्यांच्या दिनचर्येप्रमाणे सोमवारी रुग्णांची तपाणी करून रात्री आपल्या घरी परतले. काही शस्त्रक्रियाही त्यांनी केल्या. कुटुंबियांसोबत जेवण करून ते झोपायला निघून गेले. त्यानंतर नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे सहा वाजता त्यांचे कुटुंबीय त्यांना उठवायला गेले असता ते झोपेतून उठले नाहीत. कुटुंबीयांनी तात्काळ गांधी यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
डॉ. गौरव गांधी यांच्या मृत्यूची माहिती कळताच अनेक लोकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. गांधी यांनी उपचार केलेले अनेक रुग्ण देखील उपस्थित होते. ज्यांचा गांधी यांनी जीव वाचवला अशा रुग्णांना अश्रू अनावर झाल्याचं देखील चित्र होतं.
हे ही वाचा:
बीकॉम, मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन्स अभ्यासक्रमांना वाढता प्रतिसाद
‘वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतनाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग नाही’
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार
गौरव गांधी यांनी जामनगर येथून एमबीबीएस आणि नंतर एमडीची डिग्री घेतली होती. यानंतर कार्डियोलॉजीचे शिक्षण अहमदाबाद येथून घेतलं. ते जामनगर येथे प्रॅक्टिस करत होते. त्या भागातील सर्वात चांगले डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती.