29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषराष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार

राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Google News Follow

Related

राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत दुर्बल घटकातील कामकाजी महिला, पाळणाघर महिला कमर्चारी यांच्याबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, ऑल एन.जी.ओ.वेल्फेअर असोसिएन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दादाराव डोंगरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा.. 

राज्यातील ४७ शहरांमध्ये ‘जल दिवाळी’ अभियानाचे आयोजन  

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरेंची निवड!

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. आतापर्यंत केंद्राकडून आलेले अनुदान व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या तसेच त्या कालावधीतील सर्व तपशील तपासून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

जेथे कामगार जास्त आहेत, अशा ग्रामीण भागात आणि शहरी भागातही जिथे अंगणवाडीला जोडून एखादी खरेदी असेल अशा ठिकाणी पाळणाघर  सुरू करण्याचे विचाराधीन आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे  पाळणाघर सुरू  करण्याबाबतही निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री तटकरे यांनी दिली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा