राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!

देशभरातून राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या २२ जानेवारीच्या ‘प्राण प्रतिष्ठे’ला ‘नाच-गाण’ म्हणून संबोधल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. २७ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल गांधी उपेक्षित लोकांचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला सेलिब्रिटी कार्यक्रमात रुपांतरित केल्याबद्दल सरकारची निंदा करताना दिसून आले आहे.

“त्यांनी अमिताभ बच्चन, अदानी, अंबानी आणि इतर सेलिब्रिटींना आमंत्रित केले. तिथे एक तरी शेतकरी होता का ? मजूर होता का ? तिथे नुसता डान्स चालू होता, असे त्या क्लिपमध्ये त्यांनी म्हटले असल्याचे स्पष्ट दिसून येते. राहुल गांधींच्या या टिप्पण्यांवरून भारतीय जनता पक्षाकडून लगेचच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर त्यांची श्रद्धा आणि हिंदू धार्मिक विधींबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हेही वाचा..

कुलगाममध्ये दोन दहशतवादी टिपले, एके-४७सह दारूगोळा जप्त!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!

दहशदवादी गोळ्या झाडायचे तेव्हा काँग्रेस पांढरे झेंडे दाखवायची

पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नीमधील वाद विकोपाला !

भाजप नेते तीरथ सिंह रावत म्हणाले, कदाचित राहुल गांधी यांना अजून भारतीय संस्कृती समजू शकलेली नाही. जेव्हा ते भारतीय संस्कृती समजून घेऊ शकतील तेव्हा त्यांना हे सर्व विधी समजतील. त्या उत्सवात सामान्य लोक सामील झाले होते.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीही काँग्रेस नेत्याच्या टिप्पण्यांना “दुःखदायक” म्हणत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने हिंदूविरोधी भावनांचा रेकॉर्ड सिद्ध केला आहे.

त्याच्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, हे इतर कोणत्याही श्रद्धा आणि त्यांच्या धार्मिक प्रसंगांबद्दल म्हणता येईल का ? राहुल गांधी यांच्या कुटुंबाने रामजींच्या अस्तित्वाला, राममंदिराला विरोध केला आहे, त्यांच्या सरकारने हिंदू दहशतवादाची रचना केली आहे आणि त्यांनी द्वारका पूजेला आता “नाटक” असे नाव दिले आहे.

Exit mobile version