मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर १०० फूट खोल दरीत कोसळला

या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर १०० फूट खोल दरीत कोसळला

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. एक कंटेनर ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळला आहे. तर याच अपघातात दुसऱ्या एका ट्र्कच्या पुढच्या भागाला फटका बसला. त्यामुळे या ट्र्कचे कॅबिन आणि मागे असलेल्या मालवाहू सामानासह वेगळे झाले आणि ट्रकचे कॅबिन चालकासह दरीत कोसळले. या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. तर एकाला वाचवण्यासाठी बचावकार्य केले जातं आहे.

खोपली जवळ बोरघाट उतरताना मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन ते चार वाहने विचित्रपणे एकमेकांना धडकल्याची माहिती समोर आली आहे. एक कंटेनर आणि आणखी एका ट्र्क चालकाची कॅबिन दरीत कोसळली आहे. शंभर फूट खोल दरीत कोसळलेल्या कंटेनरमध्ये चालकही अडकला आहे. या चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या अपघातात ट्रक आणि कंटेनरमधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताचं वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाली असून, बचावकार्य केले जातं आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. यासोबतच महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली.

हे ही वाचा :

श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर याआधीही पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई पुणे महामार्गावर १४० पेक्षा अधिक अपघातांची नोंद करण्यात आली आहे. २०२२ या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ही नोंद करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश अपघात हे लेन कटिंगमुळे होत असल्याचंही निदर्शनास आले होते.

Exit mobile version