नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

आगीत एका डब्याचे नुकसान

नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

महाराष्ट्रातील नांदेडजवळ एका ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडजवळ पूर्णा- परळी या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून याची चौकशी सुरू आहे. आग लागल्याची माहिती मिळताच ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलासह स्थानिकांनीही गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्रेनला आग लागण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे. नांदेडजवळ पूर्णा- परळी या पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याला अचानक आग लागली. नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका डब्यात ही आग लागली. गाडीच्या एका डब्याचे नुकसान झाले असून इतर डब्याला नुकसान झालेले नाही. दरम्यान, या घटनेबाबत दक्षिण मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!

खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक

घटनेनंतर ३० मिनिटांत आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली? याची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version