न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा बदलला

न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा बदलण्यात आला आहे. या मूर्तीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या मूर्तीमधील बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली असून न्यायदेवतेच्या हातात संविधान दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून या मूर्तीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मूर्तीच्या डोळ्यांची पट्टी काढून हातात तलवारीच्या जागी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी हे बदल केले आहेत. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता (कायदा) अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचे दाखवण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीच्या जागी भारतीय संविधान दाखवण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात नवा पुतळा बसवण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्वतः हा पुतळा बनवण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या पुतळ्यात डोळ्यावर पट्टी बांधण्याचा अर्थ होता की कायदा सर्वांना समान वागणूक देतो. हातातल्या तलवारीने हे दाखवून दिले की कायद्यात शक्ती आहे आणि तो अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देऊ शकतो. मात्र, नव्या पुतळ्यात एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे तराजू. पुतळ्याच्या एका हातात तराजू तसाच ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

भारताने अलीकडेच ब्रिटीशकालीन इंडियन पीलन कोड कायद्यांमध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता कायदा लागू केला आहे. न्यायदेवतेच्या मूर्तीमधील बदल हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. भारतातील न्यायदेवतेच्या जुन्या मूर्तीची प्रेरणा ग्रीक संस्कृतीतून घेण्यात आली होती. १७ व्या शतकात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हा पुतळा पहिल्यांदा भारतात आणला. हा अधिकारी न्यायालयीन अधिकारी होता. १८ व्या शतकात ब्रिटिश राजवटीत न्याय देवीची मूर्ती सार्वजनिक वापरात आली. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही आपण हे चिन्ह स्वीकारले.

Exit mobile version