मंत्री अमित शाहांचा खोटा व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यावर गुन्हा दाखल!

भाजपचे कार्यकर्ते रूपेष मालुसरे यांनी केली तक्रार

मंत्री अमित शाहांचा खोटा व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यावर गुन्हा दाखल!

लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत इंडी आघाडीचा पराभव करत मोदी सरकारने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. लोकसभेच्या निवडणुकीत इंडी आघाडीकडून बराच फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला. विशेषतः आरक्षणाचा मुद्दा, ज्यामध्ये भाजपा सरकार आले तर संविधान बदलतील, आरक्षण संपवतील. मात्र, काँग्रेसच्या खोट्या थापा लोकसभेत तोंडघशी पडल्या. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तोंडावर पुन्हा तसेच फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम काँग्रेस करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ दाखवून जनतेची पुन्हा दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे कार्यकर्ते रूपेष मालुसरे यांनी अतुल लोंढे यांच्या विरोधात सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप कार्यकर्ते रूपेष मालुसरे यांच्या तक्रारीनुसार,  १३/१०/२०२४ रोजी माझे सहकारी लोकेश दवे आम्ही दोघे रात्री ८ च्या सुमारास युट्यूबवर जुने डीबेटची पाहणी करत होतो. याच दरम्यान, १०/१०/२०२४ रोजी न्यूज-२४ या न्यूज वाहिनी वरचा डीबेट पाहिला, जो महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होता.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकिंच्या हत्येवरून आप नेत्याचा फडणवीसांवर हल्ला, पण स्वतःच झाले ट्रोल!

खलिस्तानी दहशतवादी निज्जर प्रकरणी तथ्यहीन दावे करणाऱ्या कॅनडाला भारताने फटकारले

बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

नेमबाज स्वप्निल कुसाळेला २ कोटी रुपये तर गोळाफेकपटू सचिन खिलारीला ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द!

यासदर डीबेटमध्ये चार पक्षाचे प्रवक्ते होते. त्यातील भाजपचे प्रवक्ते डॉ. गुरुप्रकाश पासवान, भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अतुल लोंढे, समाजवादी पार्टी पक्षाचे प्रवक्ते उदयवीर सिंह, शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या सुसिबेन शहा होते. यावेळी अतुल लोंढे यांनी डीबेटमध्ये मंत्री अमित शाहांचा एक व्हिडीओ दाखवला, ज्यामध्ये अमित शाह एससीएसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण रद्द करू असे म्हणत आहेत.

तक्रारीनुसार, या व्हिडीओची पाहणी केली असता, तो २३/०४/२०२३ रोजी तेलंगनाच्या रॅलीमध्ये आरक्षणाबाबत मंत्री शाह बोलताना दिसत आहेत. मात्र, अतुल लोंढे यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवला आहे, त्यामुळे जनतेची दिशाभूल अन समाजात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश दिसून येत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

 

Exit mobile version