पोलिसांच्या मदतील धावला मुंबईतील उद्योजक

पोलिसांच्या मदतील धावला मुंबईतील उद्योजक

मुंबईतील उद्योजक केतन रावल यांनी मुंबई पोलिसांना व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहणाऱ्या पोलिसांचे आयुष्य थोडे सुकर होण्यास मदत होणार आहे.

रावल यांनी यावेळी सांगितले की, ते आघाडीवरचे कर्मचारी आहेत. जेव्हा मी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना उभे राहिलेले पाहतो, आणि त्यांना वापरायला बाथरूम देखील उपलब्ध नसते तेव्हा मला फार वाईट वाटते. त्यांना उकाड्यात कित्येक तासांसाठी उभे रहावे लागते. त्यामुळे मी माझ्याकडील सर्व व्हॅनिटी व्हॅन पोलिसांना मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये ‘या’ कारणामुळे हिंसाचार सुरूच

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

जी७ परिषदेसाठी भारताला निमंत्रण

कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केवळ तातडीच्या केसेसवरच सुनावणी होणार

सध्या कोविडच्या काळात बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांना प्रचंड उकाड्यात काही ठिकाणी शौचालयाची देखील सोय नाही अशा ठिकाणी गस्तीवर तासंतास उभे रहावे लागते. त्यामुळे त्यांचा पाणी कमी पिण्याकडे कल असतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

केतन रावल यांचा मोठमोठ्या कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन पुरवण्याचाच उद्योग आहे. त्यांनी शहारूख खान, सलमान खान, अजय देवगण यांसारख्या कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन पुरवल्या आहेत.

“माझ्याकडे बॉलिवूडमधील सर्वात जास्त व्हॅनिटी व्हॅन आहेत. त्या सर्व पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. आत्ता लोकांनी एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे. पोलिसांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, आणि जेव्हा ते मला याबद्दल धन्यवाद देतात, तेव्हा मला खूप बरे वाटते.” असे रावल यांनी सांगितले आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झालेला असल्याने लवकरच संपूर्ण टाळेबंदी लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांना देखील सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version