शिर्डीच्या साईबाबांचरणी तब्बल ५ कोटी १२ लाख रुपयांचं दान

शिर्डीच्या साईबाबांचरणी तब्बल ५ कोटी १२ लाख रुपयांचं दान

शिर्डीच्या साई मंदिरात नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसांच्या साई भक्तांनी तब्बल ५ कोटी १२ लाख रुपयांचं भरभरुन दान दिले आहे. भाविकांनी दिलेल्या दानाची मोजदाद सोमवारी करण्यात आली. या गुरुपौर्णिमा उत्सवात तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले.

शिर्डीतील साईमंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्रातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होतात. शिर्डीचे साईबाबा देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे . गुरुपौर्णिमा निमित्त साई मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येते. तसेच या निमित्ताने शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचतात. कोरोना काळातील निर्बंधांमुळे दोन वर्ष भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता आले नव्हते. परंतु या वर्षी निर्बंध कमी झाल्यामुळे साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती. धुँवाधार पाऊस पडत असूनही भाविकांची गर्दी झाली होती. गुरुपौर्णिमेला समाधी मंदिरात संस्थानच्‍या विश्‍वस्‍त मीना शेखर कांबळी यांनी सहपरिवार साईबाबांची पाद्यपूजा केली. त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले. १२ ते १४ जुलै दरम्यान मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

सोने, चांदी, रोख भरभरून दान

कोरोना काळात शिर्डीच्या साईमंदिरासह व्यावसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता मात्र भक्तांच्या दान- देणगीचे प्रमाण वाढत आहे. गुरुपोर्णिमेच्या तीन दिवसात दान पेटीत २ कोटी १७ लाख देणगी, कांऊटरवर १ कोटी ५९ लाख, ऑनलाईन देणगी १कोटी ३६ लाख, १२ देशांचे परकीय चलन १९ लाख, २२ लाखा १४ हजार ४७९ ग्रॅम सोने तर ३ लाख २२ हजार रूपयांची ६ किलो ८०० ग्रॅम चांदी असे एकूण ५ कोटी १२ लाखांचे भरभरून दान भक्तांनी अर्पण केले आहे.

Exit mobile version