शरद पवारांना धक्का; सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकरांचा भाजपात प्रवेश !

चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

शरद पवारांना धक्का; सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकरांचा भाजपात प्रवेश !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून सोनवलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यात भाजपा संघटनेला बळ मिळणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की, माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनवलकर हे जिल्हा परिषदेचे नेते असून ५ हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सातारा जिल्ह्यात भाजपला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

याशिवाय त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते समाजाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहेत. राज्यात काँग्रेसची सत्ता असताना विरोधी पक्षाकडून घाणेरडे राजकारण होत नव्हते, मात्र आज हे सर्व घडत आहे. काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माधवी नाईक आदी उपस्थित होते.

हे ही वाचा..

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

पराठ्याचे दुकान चालवणारा महिलांना पाठवत होता अश्लिल व्हीडिओ, केली अटक

तातडीने तपास करा नाही तर प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल

नवी मुंबईतून पाच बंगलादेशींना अटक

 

Exit mobile version