पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर

पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेतून यष्टीरक्षक फलंदाज आझम खान बाहेर पडला आहे. आझम दुखापतग्रस्त असून तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. आझम आतापर्यंत या मालिकेत एकही सामना खेळलेला नाही.

आझमच्या पायाला दुखापत झाली आहे. वैद्यकीय अहवालानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे समोर आले होते. डॉक्टरांनी आझमला किमान १० दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे. उपचारासाठी लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. येथे पीसीबीच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो उपचार घेणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत आझम एकही सामना खेळला नाही.

२५ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाजाने पाकिस्तानकडून आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने १६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या दरम्यान ७३९ धावा केल्या आहेत. आझमने या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. आझमचा देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने १६० सामन्यात ३१८३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला पूंछमध्ये अटक!

गुनामध्ये हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचारात तिने गमावला डोळा

कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या

‘आप’चा खोटारडेपणा उघडकीस; उपराज्यपालांचा दावा!

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना १८ एप्रिल रोजी रावळपिंडी येथे खेळला जाणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना २० एप्रिल रोजी खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना ७ गडी राखून जिंकला. आता तिसरा सामना रविवारी होणार आहे. टी-२० मालिकेतील चौथा सामना लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना २५ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २७ एप्रिल रोजी होणार आहे.

Exit mobile version