राजस्थानमधील कोटा येथील एका भाजप कार्यकर्त्याला त्याच्या घराबाहेर धमकीचे पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे.कोटा येथील उद्योग नगरात राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या दरवाजावर शिरच्छेद करण्याचे धमकीचे पत्र मिळाले आहे.या प्रकरणी उद्योगनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजप कार्यकर्ता आणि पीडित मनोज कुमारने सांगितले की, जेव्हा तो घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या घराबाहेर दरवाजाला लटकलेल्या स्वरूपात एक कागद मिळाला.ज्यामध्ये लिहिले होते की, गुस्ताख-ए-रसूलसाठी एकच शिक्षा आहे, शरीरापासून डोके वेगळे, डोक्या पासून शरीर वेगळे.तुम्ही हिंदूंसाठी खूप आवाज उठविता, आता तुमचा आवाज बंद केला जाईल.आम्ही अल्लाचे सेवक आहोत आणि तुम्हाला सोडणार नाही.हे पत्र मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी पीडितेच्या घरी पोहचून भेट घेतली.
कार्यकर्त्याच्या घराबाहेर धमकीचे पत्र मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राकेश जैन आणि इतर पदाधिकारी उद्योग नगर पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने केली.दरम्यान, शहराचे वातावरण बिघडवण्यासाठी काही समाजकंटकांनी असे कृत्य केल्याचे जिल्ह्याध्यक्षांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !
“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”
गाय मारल्याप्रकरणी मीरा रोडमधून नईम कुरेशीला अटक
पीडित मनोजने सांगितले की, जानेवारीमध्ये अयोध्येत पार पडलेल्या प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यावेळी परिसरात झेंडे लावण्यावरून काही लोकांशी वाद निर्माण झाला होता.परिसरात भगवे झेंडे लावत असताना काही लोकांनी मंदिराजवळ बकरी बांधली.या वेळी काही लोकांसोबत हाणामारी झाली.यावेळी जीवे मारण्याची आणि बॉम्बॅने उडवून देण्याची त्याला धमकी देण्यात आल्याचे त्याने सांगितले.या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचेही मनोजने सांगितले.दरम्यान, आज घडलेल्या घटनेचा संबंध जानेवारीत घडलेल्या संबंधांशी जोडला जात आहे.
एसएसपी दिलीप सैनी यांनी सांगितले की, पीडितेच्या घरी धमकीचे पत्र मिळाल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.तपासासाठी पथक तयार करण्यात आले असून परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत का याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.